MNS 45 Candidates Of Announced in Vidhanshaba: महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यात आलेल्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यात आलेल्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणाही केली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. तर वरळीतून संदीप देशपांडे यांची उमेदवारी जाहीर केल्याने उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात स्पष्ट टक्कर होणार आहे.
काल सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीला भेट दिली. यावेळी त्यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरे यांनी आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि ठाण्याच्या जागेसाठी अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली.
MNS 45 Candidates Of Announced in Vidhanshaba
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/gmBAIzsfRb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2024
हेही वाचा: भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी! कल्याणमध्ये गणपत गायकवाड तिकीट कापले, तरीही…
मनसे 225 ते 230 जागांसाठी निवडणूक लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनसे नवीन दावेदार उघड करू शकते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे महायुतीची पाठराखण करणार का? प्रत्येकजण याचा काही ना काही विचार करत होता. राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी पाहता, राज ठाकरेंनी एकला चलोचा नारा स्वीकारल्याचे पुन्हा एकदा लक्षात येते.
मनसेकडून कुणाकुणाला उमेदवारी जाहीर?
कल्याण ग्रामीण मधुम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरातून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगीता चेंदवणकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.