Fadnavis big announcement for Pune residents: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महायुतीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुण्याच्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासासाठी 44 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ त्यांनी जाहीर केला आहे.

पुण्यातील प्रचारसभेत बोलताना फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझा फोकस वादावर नाही, तर फक्त विकासावर आहे.”
यावेळी त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष टोला लगावत,
शरीफ आहे हम… लेकिन जमाना जानता है, हम किसीके बाप से डरते नही” असे म्हणत सभेत उत्साह निर्माण केला.
मेट्रो, पाणी आणि विकासकामांवर भर
पुणे मेट्रोबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की,
पूर्वी केवळ घोषणा होत होत्या, पण ठोस निर्णय नव्हते. मात्र आता 33 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क पूर्ण झाले असून, आणखी 24 किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाणीपुरवठ्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की,
पुण्यात काही भागात 24 तास पाणी, तर काही भागात फक्त 1 तास पाणी मिळायचे. ही तफावत दूर करण्यासाठी 24×7 पाणीपुरवठा योजना केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.
पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे मोठी डोकेदुखी
पुण्यातील ट्रॅफिक समस्येवर फडणवीसांनी परखड शब्दांत टीका केली.
ते म्हणाले देशात सर्वात कमी म्हणजे फक्त 9% रस्ते पुण्यात आहेत. 32% रस्त्यांवर 80% ट्रॅफिकचा भार आहे. पीक अवरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी वेग पुण्यातच असतो. नाव न घेता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत,
हे नियोजन कोणी केलं, ते सांगण्याची गरज नाही. पण आरशात पाहण्याची वेळ आता आली आहे, असा टोला लगावला.
2030 चा मास्टर प्लॅन: 44 हजार कोटींची गुंतवणूक
फडणवीसांनी पुण्याच्या भविष्यासाठी 2030 चा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मास्टर प्लॅन सादर केला आहे.
या योजनेअंतर्गत,
- ट्रॅफिक समस्या सोडवणे
- उपनगरांना मुख्य शहराशी जोडणे
- पायाभूत सुविधांचा वेग वाढवणे
यासाठी 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाणी पिले आणि सभा गाजली
सभेदरम्यान पाणी पिताना फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली,
“आज मी इथे पाणी पीत आहे, पण निवडणुकीत विरोधकांना मात्र पाणी पाजणार आहे.”
या विधानावर सभेत उपस्थितांनी जोरदार टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली.

1 thought on “पुणेकरांसाठी मोठी घोषणा! फडणवीसांचा 44 हजार कोटींचा मास्टर प्लॅन जाहीर…”