Congress Office Vandalized BJP Workers: भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली आहे. आंदोलन दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काँग्रेस मुख्यालयावर हल्लाबोल केला.
मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक होत थेट काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्लाबोल केला. भाजप युवा मोर्चाच्या सदस्यांनी मुंबईतील किल्लाकोर्ट परिसरातील काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला आणि मोठा गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकली, दगडफेक केली आणि तोडफोड केली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
मुंबईतील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री पाच वाजण्याच्या सुमारास काँग्रेस विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र काही वेळातच या मोर्चाने आक्रमक रूप धारण केले आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फोर्ट कोर्ट परिसरातील काँग्रेस कार्यालयावर धडक दिली.
Congress Office Vandalized BJP Workers
BIG SHAME 🚨🚨
— Ankit Mayank (@mr_mayank) December 19, 2024
BJP goons attacked & vandalised Congress Party Office in Mumbai
But Police soon gave them proper BÉLT TRÈATMENT 🔥🔥🔥
BJP is officially a party of goons 🚨 pic.twitter.com/cNtN6FgJSK
भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर लावलेल्या राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पोस्टरवर शाई फेकली. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा: धनुष्यबाण चिन्ह हटवले, बंडाचा इशारा, एकनाथ शिंदे गटातील हा नेता नाराज…
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोडही केली. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि पोस्टर्स फाडले. यावेळी दगडफेकही करण्यात आली. तसेच भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलीस लाठीमार करताना दिसले. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काँग्रेसने नेहमीच संविधानाचे केले, बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या देत असल्याचे सांगत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.