Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, आणि किती वाजता घडला नेमकं काय आहे प्रकरण ? महत्त्वाची अपडेट समोर आली..

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुख यांच्यावर कसा हल्ला आणि शनिवार उशिरा नेमका कसा झाला? या प्रकरणातील पोलिस स्वीय सहायक उज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Anil Deshmukh Attack

महाराष्ट्रत सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूच आहे. काल महाराष्ट्रातील प्रचाराचे हत्यार आणि थोफा थंडावले आहे. 18 नोव्हेंबर, रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. या दरम्यान अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या नंतर नागपुरात तणावाचे वातावरण आहे.

अनिल देशमुख यांच्यावर सध्या नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त पाठवला आहे. या प्रकरण राजकीय वातावरण तापले आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक उजळक भोयर यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

उज्वल भोयर यांनी माहितीनुसार, काल विधानसभा निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अनिल देशमुख हे त्यांच्या मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी नरखेडमध्ये गेले होते. शनिवार 8.15 बेलफाटा येथे अनिल देशमुख यांच्या कारला अज्ञात हल्लेखोराने गाडीवर हल्ला केला. बेलफाटा जवळ थोडे वळण आल्यामुळे आमच्या गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे चार अज्ञात हल्लेखोरांनी गाडी अडवली आणि दगडफेक सुरू केली.

‘बटेंगे तो कटेंगे’ वर आता नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य, विरोधी पक्षावर केली फटकेबाजी… तर ठाकरे आणि मी शत्रू नसल्याचा…

अनिल देशमुख हे चालकांच्या बाजूच्या सीटवर बसले होते. हल्लेखोराने कारच्या पुढील काचेवर मोठा दगड फेकला. त्यामुळे समोरील काचा फुटल्या. अन्य एका हलखोराने देशमुख यांच्यावर दगडफेक केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या कपाळातुन रक्त प्रवाह चालू झाला. यानंतर आम्ही तात्काळ त्यांना दुसऱ्या गाडीतून कटोल ग्रामीण रुग्णालयात नेले. यादरम्यान रेल्वे फाटक बंद असल्याने थोडा वेळ उशीर झाला. पण प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलवण्यात आले.

हल्लेखोरांकडून ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, पारडसिंगाजवळील बेल फाटा परिसरात अंधाराचा फायदा घेत दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत कारच्या पुढील काचेचे पूर्ण नुकसान झाले आहे. पोलिसांकडून गाडीची तपासणी करण्यात आली. हल्लेखोर ‘भाजप जिंदाबाद’ आणि ‘अनिलबाबू मुर्दाबाद’ अशा घोषणा देत होते, असेही बोललं जात आहे. या हल्ल्यानंतर ते हल्लेखोर दोन मोटारसायकलीं वरून भारसिंगी रस्त्याने फरार झाले.

Anil Deshmukh Attack

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

RBI To Cut Interest Rates: महागाई नियंत्रणाबाहेर, आरबीआय व्याजदर कमी करणार? लवकरच निर्णय घेणार आहे

Tue Nov 19 , 2024
RBI To Cut Interest Rates: डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) पुन्हा बैठक होणार आहे. धोरणात्मक व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाईल. डिसेंबरमध्ये होणाऱ्या आरबीआयच्या या निकालाकडे […]
RBI To Cut Interest Rates

एक नजर बातम्यांवर