Vithuraya Praksha Puja completed in Pandharpur: आषाढी एकादशीला वारीत दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना शेकडो तास आणि रात्री दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाची पूजा करण्यात आली.
विठुरायाला गरम पाण्याने व दह्याने स्नान घालण्यात आले. यावेळी विठुरायाच्या थकव्यासाठी अकरा देव ब्राह्मणांच्या उपस्थितीत गरम पाण्याने स्नान व दह्यादूधानं विठुरायाला रुद्राभिषेक करण्यात आला. व पंढरपुरात प्रक्षाळ पूजा संपन्न झाली आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” नेमकी काय आहे, कशाप्रकारे अर्ज करता येईल संपूर्ण माहिती जाणून घ्या
आषाढी यात्रेत हजारो उपासकांसाठी तासनतास उभ्या राहिलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला आज उतरवण्यात आले. थकलेल्या देवाची आराधना करण्याची ही प्रदक्षिणा पूजनाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आषाढी यात्रेनंतर शेकडो वर्षांपासून प्रक्षाळ पूजा आजही करण्यात आली. आषाढी एकादशीला वारीत दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना शेकडो तास आणि रात्री दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाची पूजा करण्यात आली. विठुरायाला गरम पाण्याने व दह्याने स्नान घालण्यात आले.
Vithuraya Praksha Puja completed in Pandharpur
अकरा देव ब्राह्मणांसमोर विठुरायाला या खास प्रसंगी रुद्राभिषेक झाला. 17 वनस्पतींपासून बनवलेले आयुर्वेदिक मिश्रणही अर्पण करण्यात आले. यानंतर देवाची नेहमीची नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता मंदिराचे गर्भगृह व मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच हे दृश्य बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून भाविकांचे दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.