There is no moon garden on Ganesh Chaturthi: हिंदू धार्मिक शास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन न करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर तुम्हाला चंद्र दिसला तर काय करावे.
मुंबई : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तिथी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. तसेच या वर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. गणेश स्थापनेची वेळ शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.01 ते 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.37 पर्यंत आहे. दरम्यान, देशभरातील घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजा केली जाणार आहे. परंतु गणेशाचे आगमन होताच, त्यावेळी चंद्रदर्शन करू नये, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. गणेश चतुर्थीला चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. त्यामागचे कारणही तसेच आहे.
श्री गणेशाने क्रोधाने चंद्राला शाप दिला.
पौराणिक कथेनुसार, एके दिवशी भगवान श्री गणेश आपले वाहन मुषक या उंदरावर म्हणून फिरायला गेले. तेवढ्यात अचानक उंदीर अडखुन पडला. ते सर्व प्रकार पाहून चंद्रा हसला. त्यामुळे चंद्राच्या या कृत्याने गणेशाला खूप राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला.
हेही वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी मुंबई-कुडाळ स्पेशल ट्रेन धावणार, जाणून घ्या..
चतुर्थीला चंद्रदर्शन करणे अशुभ आहे
भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीच्या रात्री जो चंद्र बघणार त्याच्यावर गणेशाची कृपा राहणार नाही. धार्मिक शास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करू नये. जर तुम्हाला त्या दिवशी चंद्र दिसला तर तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात किंवा काही अडचणी येऊ शकतात.
There is no moon garden on Ganesh Chaturthi
तुम्हाला चुकून चंद्र दिसला तर काय करायचा ?
गणेशाच्या आगमनाच्या वेळी चुकून चंद्र दिसल्यास किंवा अनवधानाने चंद्र दिसल्यास घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी एक पर्याय काढण्यात आला आहे. भक्ताने चुकून चंद्र पाहिला तर त्याने गणेशाला नमस्कार करावा. त्या दिवशी गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश मंत्र म्हणावा. त्यामुळे गणरायांकडून भक्तांना क्षमा केली जाते.
गणेशाच्या या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीने चतुर्थीचे व्रत करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे.