ST Employee Strike: एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचा संप केल्याने नागरिकांचे मोठे झाले आहेत. या संपाच्या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एसटी कर्मचारी कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे पगार मिळावे, आणि एसटी कर्मचाऱ्यांची प्राथमिक मागणी असून, त्यांनी सुरू केलेला संप आहे. एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने या गणेशोत्सवावर चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. या संपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज एसटी संपावर तोडगा निघेल, असा अंदाज आहे.
एसटीतील कामगार मागण्यांवर ठाम आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची काल बैठक झाली. या बैठकीत उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना संप संपवण्याचे आवाहन केले. ऐन गणेशोत्सवामुळे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये. म्हणून संप मागे घ्या, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची सरकारच्या बैठकीत कोणतेही निर्णय लागलेले नाही.
हेही वाचा: गणेश चतुर्थीची तारीख, शुभ वेळ, उत्तर पूजा आणि विसर्जन पूजा सर्व जाणून घेऊया..
त्यानंतर एसटी कर्मचारी कृती समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात संध्याकाळी 7 वाजता हि बैठक सुरू होणार आहे. आज या बैठकीत एसटी कामगार आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांना कळवणार आहेत. या बैठकीमुळे तोडगा निघेल का? यावर सर्वांचे लक्ष वेधून आहे.
एसटी कृती समितीचे सदस्य संदीप शिंदे काय म्हणाले ?
“आम्ही संप केला आहे पण आम्हीही खूश नाही. कारण आम्ही कुठल्याही उत्सवात तुम्हाला मदत करत असतो. कोरोनाच्या काळात आम्ही नागरिकांना प्रत्येक राज्यच्या सीमेवर सोडण्याचे काम करत होतो. प्रवासीला आम्ही आमचा देवमाणूस आहे. तथापि, आम्ही देखील आमच्यावर झालेल्या अन्यायामुळे आम्ही संप करत आहोत, असे सांगून एसटी कृती समितीचे संदीप शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांची बैठक आणि अंतिम निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?
प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढता घरभाडे भत्ता आणि फरक वेतनवाढीच्या दरातील फरक यासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांन प्रमाणे पगार मिळावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. शिवाय, उर्वरित रु. 4849 कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. याशिवाय, एसटी कर्मचारी मूळ नुकसानभरपाई मध्ये घोषित केलेल्या 5000, 4000 आणि 2500 रुपयांव्यतिरिक्त 5000 हजार रुपयांची विनंती करत आहेत.
- खाजगीकरण बंद करा.
- वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
- कठोरपणे बदललेली अर्ज प्रक्रिया आणि शिस्त दूर करा.
- घरामध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वैद्यकीय कॅशलेस कार्यक्रम लागू करा.
- निवृत्त आणि जुन्या कामगारांना पेन्शन मिळण्यासाठी जे अडथळे दूर करावे . याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी संयुक्त घोषणेनुसार आवश्यक सुधारणा करणे आवश्यक आहे.
- सध्याच्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सर्व बसमध्ये मोफत एक वर्षाचा पास द्या.
- चालक, वाहतूकदार, कार्यशाळेतील कामगार आणि महिला कर्मचाऱ्यांना आधुनिक, आरामदायी स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या.
- सरकारच्या मालकीच्या नवीन बस खरेदी करा आणि जुन्या बस बंद करा.
ST Employee Strike
विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या व इतर मागण्या मान्य कराव्यात, असे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी काळपासून संपाची घोषणा केल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे. या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.