शाळांमध्ये चाललंय काय? पुणे, बदलापूर पाठोपाठ आता अकोल्यातील 6 विद्यार्थिनींना त्यांच्या वर्ग शिक्षकाकडून लैंगिक छळ…

Pune-Badlapur-Akola Crime News: बदलापूर येथील एका शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील सफाई कामगाराने दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे पुरावे समोर आले आहेत. याचा धक्का राज्यभरातील नागरिकांना बसला. संतप्त जमावाने बदलापूर येथे दगडफेक करून तोडफोड केली. ही घटना ताजी असताणाच आता अकोल्यात एक भन्नाट प्रकरण उघडकीस आले आहे.

sexual harassment of girls-by teacher in akola

अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील एका जिल्हा परिषद शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या वर्गशिक्षकाने 6 मुलींना मोबाइलला वर अश्लील व्हिडिओ दाखवले आहे. जर शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शाळा मध्ये सुरक्षिता नाही तर महाराष्ट्रला हि गोष्ट काळीमा फासणारी आहे. तसेच शाळा मध्ये सरस्वती मातेचे घर म्हणून ओळखले जाते तेथे असे प्रकार घडतात हे महाराष्ट्रसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.

अकोल्यातील वर्गशिक्षकाकडून लैंगिक छळ

गेल्या चार महिन्यांपासून हा वर्ग शिक्षक तेथे शिकणाऱ्या मुलींची छेड काढत होता. विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून वाईट ठिकाणी स्पर्श करत होता. तो त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत असत. या प्रकरणी शिक्षकावर पॉस्को सह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा: बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोन आठवड्यांत अहवाल मागवला..

गेल्या आठवड्यात मंगळवारी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलींनी घरी आल्यानंतर घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी थेट उरळ पोलिस ठाण्यात जात नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दिली आहे.

बदलापूर पाठोपाठ पुण्यातही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी परिस्थिती गांभीर्याने घेत लगेचच सहा महिलांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. प्रशिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. संबंधित शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

अशातच पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठेतील शाळेच्या स्वच्छतागृहात एका मुलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. 15 ऑगस्टरोजी हा सर्व प्रकार घडला. या संपूर्ण प्रकरणी आता अधिक तपास देखील सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Rajiv Gandhi Rural Electrification Yojna: राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेबद्दल जाणून घेऊया…

Thu Aug 22 , 2024
Rajiv Gandhi Rural Electrification Yojna: 2005 मध्ये सुरू करण्यात आलेली, ग्रामीण विद्युतीकरण योजना आणि घरगुती वीज जोडणी योजना राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGVY) हि […]
Rajiv Gandhi Rural Electrification Yojna

एक नजर बातम्यांवर