Press conference by Rajeev Kumar in Maharashtra: ‘आपला महाराष्ट्र, आमचे मत’ हे यंदाचे ब्रीदवाक्य असल्याचे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यात अकरा राजकीय पक्ष आहेत आम्ही त्यांच्याशी बोललो. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन सर्व पक्षांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचा सल्ला दिला. राजीव कुमार यांनी असेही सांगितले की त्यांनी सांगितले आहे की निवडणुका आठवड्याच्या मध्यभागी होतील आणि मतदान सुट्टीच्या दिवशी होऊ नये.
महाराष्ट्रातील अकरा राजकीय पक्षांच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या अपेक्षा आणि आयोगाचे कार्य स्पष्ट केले. विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. आणि त्या आधी निवडणूक होईल असे संकेत आहे.
"तमाम महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा"
— Election Commission of India (@ECISVEEP) September 28, 2024
सीईसी श्री राजीव कुमार महाराष्ट्र राज्य में चुनावी समीक्षा बैठक के दौरान #AssemblyElections2024 #MaharashtraElections #ECI pic.twitter.com/xsi9xF4gJK
Press conference by Rajeev Kumar in Maharashtra
वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करा. वृद्धांचे व्यक्तीचे मतदान जास्तीत होईल अशी सोय करा तसेच पैशाच्या गैरवापरावर कुठेही होऊ नये असे निर्बंध आणण्याची मागणीही राजकीय पक्षांनी केल्याचे कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा: देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेचे पैसे लवकर जमा होणार..
महाराष्ट्रात 9.60 कोटी मतदार आहेत. या एकूण मतदारांपैकी महिला 4.65 कोटी आणि पुरुष मतदारांची संख्या 41.96 कोटी आहे. सुरुवातीला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 11.47 लाख आहे. महाराष्ट्रातून 10 लाख 1 हजार 80 बूथ आहेत.. शहरातील बहुतेक बूथवर सीसीटीव्ही असतील, असेही राजीव कुमार म्हणाले.