Hartalika Vrat 2024: पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केल्या जाणाऱ्या हरतालिकेच्या व्रताला खूप महत्त्व आहे. हे व्रत करताना स्त्रिया भगवान शिव आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तींची विधिवत पूजा आणि उपवास करतात.
हरतालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून अंघोळ करून पूजा मांडावी आणि कथा वाचून आरती करावी. तसेच भगवान शिव आणि पार्वती देवी यांचे नामस्मरण करावे. या दिवशी आळस करू नये किंवा झोपून राहू नये. हरतालिकेचे व्रत करताना दिवसभर आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचा विकास आणि यश हे पूर्ण हरितालिके व्रतावर अवलंबून आहे, जे अत्यंत आवश्यक मानले जाते. हरितालिका व्रत हा सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानला जातो. कारण शिव आणि पार्वती या दोन देवतांचे एकत्र उपवास हा खूप कठीण परिस्थती करावा लागतो.
या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्नपाण्याशिवाय उपवास करतात. तसेच अविवाहित मुलीं म्हणजे ज्यांचे लग्न झाले नाही अशा मुलीने हे अगोदर व्रत करावे. कारण अविवाहित मुलीना भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादामुळे योग्य मुलगा (वर) मिळणे अपेक्षित आहे.
हरितालिका पूजेची वेळ
हरितालिका व्रत शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबरला आहे. भगवान शिव या दिवशी देवी पार्वतीला आपली पत्नी स्वीकारली होती. त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खरोखरच महत्त्वाचे आहे. हरितालिकेचे व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे.
हेही वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी मुंबई-कुडाळ स्पेशल ट्रेन धावणार, जाणून घ्या..
यावर्षी हरितालिका पूजेची वेळ 6.02 ते 8.33 पर्यंत आहे. वेळ- 2 तास 31 मिनिटे. गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.21 वाजता तृतीया तिथी सुरू होईल. शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.01 वाजता तृतीया तिथी समाप्त होईल.
हरितालिका व्रत पूजा विधी
हरितालिका व्रत पूजा विधी: गणेश, शिव, माता पार्वती आणि हरितालिका व्रत पूजनीय आहेत. सर्व प्रथम तीन मातीच्या मूर्ती बनवा आणि हळद कुंकूचा आणि गणेशाला दुर्वा अर्पण करा.
Hartalika Vrat 2024
यानंतर भगवान शंकराला फुले, बेलापत्र अर्पण करा आणि नंतर पार्वतीला सौंदर्य (मेकअप ) सामान अर्पण करा. यानंतर गणपतीची आरती करा. आरतीनंतर शिव आणि माता पार्वतीला नेवैद्य दाखवा.