Gold And Silver Price Today: सोन्याच्या दरात वाढ आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात आणखी एक वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या सोन्याचे दर (ज्याला गोल्ड रेट हाइक असेही म्हणतात) वाढल्याने ग्राहक आता चिंतेत आहेत. सोन्याबरोबरच चांदीही महाग झाली आहे. आता सर्वसामान्य लोकांच्या शुभ कार्यक्रम करताना खूप विचार करावा लागणार आहे. तर आज आपण सोने व चांदीचा भाव जाणून घेऊया .
आज सोन्याची आणि चांदीची किंमत:
- 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,960 रुपये आहे.
- 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,850 रुपये आहे.
- 1 किलो चांदीची किंमत: 92,130/
पूर्वीच्या किंमती:
10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,630 रुपये आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,500 रुपये आहे.
चांदीची किंमत 90,760 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
हि वाढ कशामुळे होते ?
सोन्याच्या किमती अनेक कारणांमुळे वाढल्या आहेत. यामध्ये रशिया आणि युक्रेनमधील युद्ध, महागाई, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि जगभरातील बाजारातील अस्थिरता यांचा समावेश आहे. तसेच आता सगळे कडे होणारे निवडणूक याचाही बाजारात खूप प्रभाव पडलेला आहे .
हेही समजून घ्या: शेतकऱ्यांनो, तुमच्यावरही कर्ज आहे का? कर्ज फेडले नाही तर बँक कायदेशीर कारवाई…
आता ग्राहकांवर काय परिणाम होणार ?
सोन्याच्या दरात झालेल्या या वाढीचा फायदा ग्राहकांना होत नाही. सोन्याचे दागिने खरेदीचा खर्च वाढला आहे. लग्नाच्या संपूर्ण हंगामात ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांना सोने घेणे खूप कठीण आहे . तसेच सोन्याच्या किमतीच्या भविष्यातील हालचालींचा अंदाज लावणे आव्हानात्मक आहे. जागतिक बाजारातील स्थितीचा सोन्याच्या दरावर परिणाम होत राहील.
सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
- सोने खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या विक्रेत्यांद्वारे ऑफर केलेल्या किमतींची पडताळणी करा.
- सोन्याच्या शुद्धतेचे दुकानदाराचे प्रमाणपत्र मिळवा.
- केवळ हॉलमार्क असलेले सोने खरेदी करा.
- सोने खरेदी केल्यानंतर त्याचा विमा उतरवा.