मुंबईतील दादर परिसरात असलेल्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आल्याने आज मोठा राडा झाला. जैन समाज रस्त्यावर उतरून आक्रमक झाला. यानंतर काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले. पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. आता यावर मंगलप्रभात लोढा यांनी मोठे भाष्य केलंय.

कबूतरखाना परिसरात जैन समाज आज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. महापालिकेकडून कबूरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री त्यांच्याकडून काढण्यात आली. हेच नाही तर काहीवेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महिलांनी थेट कबूरखान्यात उड्डी घेतली आणि ताडपत्री फाडत कबूतरांना धान्य टाकते. यामुळे काही वेळ कबूरतखाना परिसरात ताणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिस देखील घटनास्थळी मोठ्या संख्येने पोहोचले.
हे जे काही झाले ते बाहेरील लोकांनी केले आहे
आता या मंगलप्रभात लोढा सर्व प्रकारावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठे भाष्य केले. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जे काही याठिकाणी सकाळी झाले ते अत्यंत चुकीचं होतं, मी मंदिरात जाऊन ट्रस्टींसोबत चर्चा केली, ते म्हणाले की, हे जे काही झाले ते बाहेरील लोकांनी केले आहे. त्यामध्ये मंदिर ट्रस्टींचे काहीही नाहीये. आम्ही आंदोलन रद्द केले होते. मुख्यमंत्र्यांनी काल जे काही निर्देश दिली होती, त्यामध्ये आम्ही समाधानी होतो. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले.
हे सुद्धा वाचा: Malegaon Bomb Blast Case: आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया…
सकाळी जे झाले, त्यामध्ये जैन समाज किंवा साधुसंत कोणीही सहभागी नव्हते. जे सकाळी झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कायद्यादा आम्ही हातात घेणार नाहीत, असेही ट्रस्टींनी आम्हाला सांगितले. मी देखील लोकांना विनंती करतो की, शांतता राखा. उद्या कोर्टाची केस आहे. जे कोणी हे केले त्यांनी कबूतरांचे देखील मोठे नुकसान केले होते. बाहेरचे लोक कोण होते हे माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले. पण यामध्ये ट्रस्टचे कोणीही लोक नसल्याचे सांगताना मंगलप्रभात लोढा हे दिसले आहेत.
मंगलप्रभात लोढा यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि अचानक कबूतरखाना परिसरात लोक जमले आणि त्यांनी कायदा हातात घेत कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, आंदोलक हे अधिकच आक्रमक होताना दिसले. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला काढले. आता उद्या या प्रकरणात कोर्टात सुनावणी आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.