EPFO Claim Process: अवघ्या तीन दिवसांत पीएफमधून एक लाख रुपये काढा; तुम्हाला फक्त “हे” नियम माहित असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, शिक्षण, विवाह, घर खरेदी किंवा इमारत व इतर यांसाठी कारणासाठी EPFO ने ऑटो-मोड सेटलमेंट सुविधा सुरू केल्या आहेत.
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांसाठी कायमची योजना आखली आहे. कर्मचारी सदस्यांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी EPFO ने आता विविध धोरणांमध्ये बदल केले आहेत. वैद्यकीय, शिक्षण, विवाह, घर खरेदी किंवा इमारत यांसाठी EPFO ने ऑटो-मोड सेटलमेंट सिस्टम सेट केली आहे. हा विशेषाधिकार सर्व पीएफ खातेधारकांना उपलब्ध आहे ज्यांचे उत्पन्न सहा कोटींपेक्षा जास्त आहे. जी आपत्कालीन परिस्थितीत पीएफ धारकांना पैसे मिळवण्याचे काम करणार आहे.
EPFO Claim Process
या EPFO सुविधेसाठी 15 ते 20 दिवस लागायचे, मात्र आता फक्त 3 ते 4 दिवस लागणार आहे. सभासदाची पात्रता, कागदपत्रे, ईपीएफ खात्याची केवायसी स्थिती, बँक खाती इत्यादी तपासल्यापासून इतका वेळ लागायचा. पण आता ह्या सुविधा लवकर मंजुरीसाठी पाठवले जातात, जेणेकरून क्लेम करणं सहज होईल.
कोण करू शकतं क्लिम?
क्लिम संदर्भात ऑटो मोडमध्ये एप्रिल 2020 मध्येच आपत्कालीन परिस्थितीत पैसे सेटलमेंटचा परिचय होता, तथापि त्या वेळी केवळ आजारपणातच पैसे काढले जाऊ शकत होते . पण आता त्यात अजून भर करण्यात आली आहे. आजारपण, शिक्षण, लग्न, घर खरेदीसाठी ईपीएफमधून पैसे घेऊ शकतात. घरात बहीण आणि भावाचे लग्न असल्यास जास्त रक्कम देखील काढता येणार आहे.
हेही समजून घ्या: लाडकी बहीण योजनेवरून कोर्टाकडून मोठी बातमी, स्थगिती फेटाळली; न्यायाधीश काय म्हणाले?
कोणी किती पैसे काढू शकतो?
पूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती, आता EPF खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम वाढवण्यात आली आहे. मोबाइलला किंवा संगणकावर ऑटो सेटलमेंट मोड वापरून आगाऊ पैसे काढता येणार आहे. यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही, आणि पैसे तीन दिवसात तुमच्या खात्यात पाठवले जातील. यासाठी KYC, क्लेम रिक्वेस्टची एलिजिबिलिटी आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.
पैसे काढण्याची प्रक्रिया
- EPFO पोर्टलवर लॉग इन करा. किंवा PF_LINK या लिंक वर क्लिप करा
- त्यांनतर प्रथम तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाका
- आता ऑनलाइन सेवा वर जाऊन मग ‘क्लेम’ सेक्शन वर क्लिप करा.
- बँक खातं व्हेरिफाय करा
- त्यांनतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा.
- नवीन पेज उघडल्यावर तुम्ही पीएफ ॲडव्हान्स फॉर्म 31 निवडणे आवश्यक आहे.
- आता तुम्ही पीएफ खाते (नंबर) निवडा.
- तुम्ही आता पैसे काढण्याचे कारण लिहा , आणि पैसे काढण्याची रक्कम मग तुमचा राहण्याचा पत्ता भरावा लागेल.
- पुढे तुम्हाला पासबुक किंवा बँक चेकची स्कॅन (फोटो ) प्रत अपलोड करावी लागेल.
- यानंतर तुम्हाला संमती द्यावी लागेल आणि आधार व्हेरिफाय करावं लागेल.
- क्लेम प्रॉसेसे झाल्यानंतर एम्प्लॉयरकडे अप्रुवलसाठी जाईल.
- त्यांनतर ऑनलाईन सर्विसमार्फत तुम्ही क्लेम स्टेटस चेक करू शकता.
- जर तुमचा फॉर्म जमा झाल्यांनतर मान्यता (Approved) मिळाला तर तुम्हाला 4/5 दिवसात तुमच्या बँक अकॉउंट मध्ये पैसे येणार .
- असे तुम्ही घर बसल्या पीएफ अकॉउंट मध्ये पैसे काढू शकता.