Bhaucha Dhakka 2024: सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या मते हा खेळ आजकाल स्क्रिप्टेड केला जातो असे वाटते. निक्कीला कुठल्याही प्रकारचा धाक देत नसून कधी पण बरोबर असते असे बिग बॉसला वाटत असते आणि प्रत्येक गोष्टीवर सूट मिळत आहे का? असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला पाच आठवडे पूर्ण झाले आहेत. रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे रेकॉर्ड मोडीत काढले असले तरी आता रितेशसोबतच बिग बॉसवरही नाराजी असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांने नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या, नक्की तांबोळीने हिंदी बिग बॉसच्या १३व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. तिला बिग बॉसच्या घरात राहण्याची, येथील परिसराची सवय आहे, त्यामुळे ती इतर उमेदवारांपेक्षा एक पाऊल पुढे राहते आणि जिंकते ठरणं सहाजिकच आहे. भाऊच्या धक्कावर प्रत्येक स्पर्धकांची रितेश शाळा घेत असताना निक्कीला काही बोलत नाही. त्यामुळे प्रेक्षकाने आता नाराजी दाखवली आहे. आणि दुसऱ्या स्पर्धकांनावर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच निकीने खळबळ उडवून दिली. एक तर अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलत आहे. खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंड असूनही अरबाज निक्कीसोबत फ्लर्ट करताना दिसला आहे. निक्कीला त्याच्या कनेक्शनबद्दल काही माहिती असली तरी अनेकांनी तिच्या अरबाजबद्दलच्या कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा: निक्की तू चावीचं माकड, आणि जान्हवी सर्वात वाईट सदस्यांपैकी आहेस भाऊच्या धक्क्यावर चौथ्या आठवड्यात रितेश कडून कॅरेट कार्यक्रम…
या आठवड्यातील बिग बॉसच्या घरातील समस्या होती निक्की…निकी…निकी…निकी विरुद्ध इतर घरातील सदस्य. निक्की आणि अभिजीतच्या नात्यामुळे अरबाजला त्रास झाला, म्हणून त्यानं घरात तोडफोड केली. रितेशने अरबाजला खूप सुनावले आहे. रितेशने आर्या जाधवलाही ऐकवले. तुम्ही तुमचा खेळ बघा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
त्यामुळे निक्की अनेक चुका करत आहे, घराच्या नियमांचे उल्लंघन करत आहे, पण बिग बॉससुद्धा पहिल्या दिवसापासून तिच्याशी कधीही संवाद साधत नाही. याउलट, इतर सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचे ऐकवले जात आहे.
दर्शकांची दिशाभूल?
तर जेव्हा जेव्हा निक्की नॉमिनेट होते नेमकीच त्याच वेळी वोटिंग लाइन्स बंद करण्याच येतात. काही कारणास्तव, एलिमिनेशन होत नाही. त्यामुळे प्रेक्षकांची फसवणूक करण्याची षडयंत्र थांबवा, असे एका नेटकऱ्याने सांगितले. निकीची प्रमोशन होती की हा भाऊचा धक्का होता? असा सवालही प्रेक्षकांनी केला आहे.
एका वापरकर्त्याने दावा केला की त्याने निक्की पुराण ऐकण्यात दीड तास वाया घालवला; उद्याच्या भाऊचा धक्का बघणार नाही. प्रेक्षकाने असे गृहीत धरले की भाऊ चुकीचे वागत आहेत. निक्कीचं सगळंच बरोबर असतं का, आणि इतर स्पर्धकांच्या चुकींसाठी फक्त भाऊचा धक्का असतो का? असा प्रश्न नेटकरी करताना दिसत आहे.