11th Admission Process 2024: अकरावीचा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया करताना नोंदणीनंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर त्या मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून अर्जाचा पहिला भाग पूर्ण करा. मग कनिष्ठ महाविद्यालय किंवा माध्यमिक शाळेची अर्जाची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.
11th Admission Process 2024: महाराष्ट्रात 10वी निकाल जाहीर केल्यानंतर 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे . मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकांसाठी, प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी आता 5 जून पासून ते रविवार 16 जून दरम्यान इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी त्यांचा कॉलेज पसंती क्रमांक भरू शकतात. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर, 26 किंवा 29 जून रोजी, तुमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्ही महाविद्यालयाला भेट घ्यावी लागेल. तर आता प्रवेश प्रक्रियाचे पहिल वेळापत्रक उपलब्ध आहे.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक
- 5-16 जून: प्रवेशासाठी आपल्या कॉलेजचे पसंती क्रमांक नोंदविणे व ऑनलाइन अर्ज सादर करणे. आणि अर्जाचा 2 भाग म्हणून अर्ज लॉक करणे, किंवा कोटा नोंदणीसाठी पसंदी म्हणून ऑनलाइन नोंदणी नोंदविणे
- 15 जून: अर्जाचा भाग १ पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे दुपारी 4.30 वाजेपर्यंत वेळ आहे.
- 18-21 जून: भाग 2 पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे, तसेच भाग 2 लॉक करणे. गुणवत्ता यादीतील काही दुरुस्ती साठी त्यावर आक्षेप नोंदवणे . आणि त्यावर उपाय म्हणून संचालकां कडून दुरुस्ती करून घावे.
11th Admission Process 2024
- 22-25 जून: वेबसाइटवर प्रवेशासाठी उपलब्ध जागांची निवड यादी पोस्ट केली जाईल. फेरीची अंतिम मुदत देखील जाहीर करतील.
- 26 – 29 जून: योग्य ठिकाणी प्रवेशाची पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे. प्रवेश निश्चिती करणे, रद्द करणे आणि प्रवेश नाकारण्याची कॉलेज लॉगिन प्रक्रिया या कालावधीत सुरू राहील.
- 29 जून: प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती साइटवर प्रविष्ट करणे.
- 1 जुलै: रिक्त पदांची दुसरी फेरी जाहीर करण्यात येणार आहे .
हेही समजून घ्या: Fake Certificate In Pune University: बँकेत 2 वर्षांची नोकरी, पुणे विद्यापीठाचे बनावट पदवी प्रमाणपत्र, उघडकीस आले सर्व प्रकार
प्रवेश प्रक्रियाचा दुसरा टप्पा
- दुसरी फेरी: जुलै 2-9
- तिसरी फेरी: जुलै 9-19
- विशेष फेरी: जुलै 20-27
2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी एक लाख तेहतीस हजार 292 मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा पहिला विभाग पूर्ण केला आहे. त्यापैकी 80 हजार 104 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक करण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड येथे शिक्षण घेण्यासाठी अर्ज केले आहेत.तर अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई, ठाणे ,नवी मुंबई येते अर्ज केले आहेत .