Triumph Discount Offer: रॉयल एनफिल्डच्या प्रतिस्पर्धी बाइक्स ट्रायम्फवर डिस्काउंट दिला जात आहे. यापूर्वी हि ऑफर फक्त ३१ जुलैपर्यंत होती. आता हि ऑफरची मर्यादा 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ट्रायम्फ मोटरसायकल वरील सवलत आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. Triumph Speed 400 आणि Scrambler 400 वर पूर्वी उपलब्ध असलेली ऑफर्स 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. Royal Enfield च्या प्रतिस्पर्धी बाइक्सवर दहा हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
ट्रायम्फची स्पर्धक मोटरसायकल रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450
भारतात प्रीमियम बाइक्सची मागणी सातत्याने वाढत आहे. ट्रायम्फच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या रॉयल एनफिल्डने नुकतीच गुरिल्ला 450 सादर केली आहे. या बाईकच्या आगमनाच्या अपेक्षेने ट्रायम्फने आपली सवलत ऑफर ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 ही ट्रायम्फ स्पीड 400 ची जबरदस्त प्रतिस्पर्धी आहे. रॉयल एनफिल्डची एक्स-शोरूम किंमत 2.39 लाख रुपये आहे. प्रत्येक राज्यानुसार किंमती बदलू शकतात. आणि ऑफर्स हि बदलू शकतात.
ट्रायम्फ स्पीड 400 फीचर्स
ट्रायम्फ स्पीड 400 हे TR-सिरीज लिक्विड-कूल्ड, फोर-व्हॉल्व्ह, DOHC, सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. बाईकमध्ये असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देखील आहे. या बाईकवरील इंजिन 8,000 rpm वर 39.5 हॉर्सपॉवर आणि 6,500 rpm वर 37.5 Nm टॉर्क निर्माण करते.
हेही वाचा: Harley-Davidson X440 वर 15000 रुपयांची सूट…
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X रंग
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक एलईडी डे टाईम रनिंग DRL सोबत एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत. बाईकची टाकी क्षमता 13 लीटर आहे.
Triumph Discount Offer
ट्रायम्फ बाइकची नवीन किंमत
ट्रायम्फच्या 400cc बाईक 10,000 सवलतीत उपलब्ध आहेत. कंपनीच्या बाईक्स 52 हून अधिक राष्ट्रांमध्ये निर्यात केल्या जातात. ही ऑफर्स 54,000 युनिट्सच्या विक्रीसाठी वैध आहे. या डिस्काउंट ऑफरमुळे ट्रायम्फ स्पीड 400 ची एक्स-शोरूम किंमत 2.24 लाख रुपये आणि Scrambler 400 ची एक्स-शोरूम किंमत कमी आहे. त्यामुळे आता बाईकचा घेण्याचा विचार करत असेल तर लवकर लवकर या संधीचा फायदा घ्या .