भारतीय बाइक मार्केटमध्ये रेट्रो आणि रॉडस्टर बाइक्सची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. Royal Enfield नंतर आता Yezdi Roadster ही बाइक तरुणांपासून ते लॉन्ग राईड प्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय होताना दिसते. दमदार इंजिन, मस्क्युलर डिझाइन आणि रस्त्यावर वेगळी ओळख देणारी स्टाइल हे या बाइकचे मोठे प्लस पॉइंट्स आहेत.

Yezdi Roadster ही फक्त एक बाइक नाही, तर रॉयल लूक आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
- Yezdi Roadster मध्ये 334cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे.
- हे इंजिन 29.7 PS पॉवर 29 Nm टॉर्क निर्माण करतं.
6-स्पीड गिअरबॉक्समुळे शहरात स्मूथ राइड मिळते आणि हायवेवरही ही बाइक जबरदस्त स्थिरता देते. थ्रॉटल दिल्यावर बाइक लगेच प्रतिसाद देते, त्यामुळे ओव्हरटेकिंग आणि लॉन्ग राइड्स दोन्हीसाठी ही बाइक परफेक्ट ठरते.
डिझाइन आणि लूक
- Yezdi Roadster चा लूक हा तिचा सगळ्यात मोठा USP आहे.
- मस्क्युलर फ्युएल टँक
- लो-स्लंग बॉडी
- रेट्रो टच असलेला आधुनिक डिझाइन
ही बाइक रस्त्यावर पाहताच लक्ष वेधून घेते.
हे वाचा: Mahindra XUV 7XO येतेय रस्त्यावर धुमाकूळ घालायला; नवीन लूक, फीचर्स आणि इंजिन डिटेल्स समोर
Matte आणि Chrome अशा विविध कलर ऑप्शन्समध्ये ही बाइक उपलब्ध आहे, त्यामुळे प्रत्येक रायडरला आपल्या पसंतीनुसार स्टाइल निवडता येते.
राइड क्वालिटी आणि सस्पेन्शन
भारतीय रस्त्यांचा विचार करून Yezdi ने या बाइकचं सस्पेन्शन ट्यून केलं आहे.
- पुढे: Telescopic Forks
- मागे: Twin Shock Absorbers
खड्डे, खराब रस्ते किंवा स्पीड ब्रेकर असले तरी बाइक कंट्रोलमध्ये राहते. लांब प्रवासातही थकवा जाणवत नाही, ही याची खासियत आहे.
Proud to see Yezdi Roadster win the 'Best 350cc Motorcycle' at the #ZeeMediaAutoSummit 2025. Even prouder of my brother, @BRustomjee, to have received this. His father, Rustom Irani, made Yezdi the powerhouse it was, and somewhere up there, he’s probably grinning ear to ear… pic.twitter.com/yUF0MpLDA7
— AT (@reach_anupam) December 11, 2025
ब्रेकिंग आणि सेफ्टी फीचर्स
- Yezdi Roadster मध्ये
- पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स
ड्युअल-चॅनल ABS मिळते. त्यामुळे हाय स्पीडमध्येही ब्रेकिंग सुरक्षित आणि विश्वासार्ह वाटते. नवख्या रायडर्ससाठीही ही बाइक सेफ मानली जाते.
फीचर्स आणि टेक्नॉलॉजी
- या बाइकमध्ये डिजिटल-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- ट्रिप मीटर
- गिअर पोजिशन इंडिकेटर
- USB चार्जिंग (निवडक व्हेरिएंटमध्ये)
अशा आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. रेट्रो लूक असूनही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बाइक मागे नाही.
किंमत आणि व्हॅल्यू फॉर मनी
- भारतात Yezdi Roadster ची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ₹2 लाखांपासून सुरू होते.
या किमतीत मिळणारा पॉवर, लूक आणि ब्रँड व्हॅल्यू पाहता ही बाइक Royal Enfield Classic आणि Meteor ला थेट टक्कर देते.
