कांद्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, या 3 शहरांमध्ये कांद्याच्या बँका सुरू होणार…

Eknath Shinde will start onion banks in 3 cities: कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

Eknath Shinde will start onion banks in 3 cities

मुंबई : कांद्याची नासाडी रोखण्यासाठी राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. तसेच कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.

यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त डॉ. विविध विभागांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

कांदा महाबँकेची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे

कांदा हे नाशवंत पीक आहे. कांदा अणुऊर्जेद्वारे विकिरण करून साठवता येतो. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांदा महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. हिंदुस्थान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून येथे कांदा बँक सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: कांद्याची खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन करायचे आहे? मग या 3 जातीची निवड करा, भरपूर उत्पादन होणार…

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेऊन हा प्रकल्प राबविण्यात यावा

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेऊन हा प्रकल्प राबवावा, असे सांगतानाच हा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांच्या माध्यमातून राबवावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम होईल. कांदा बँकेच्या वातावरणात मूल्य साखळी विकसित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे कुठल्याही प्रकारचे नुस्कान झाले नाही पाहिजे यासाठी हे सरकार काम करणार आहे.

कांदा महाबँक नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे

या बैठकीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या ठिकाणी कांद्याचे उत्पादन जास्त असलेल्या विकरण प्रक्रिया केंद्रे सुरू करून कांदा महाबँक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गालगत 10 ठिकाणी कांदा बँक ठेवण्याचा प्रस्ताव आहे

समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांदा बँक उभारण्याचे प्रस्तावित असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या फायद्याचा हा प्रकल्प असून कांदा महाबँकेमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होणार आहे. कांद्याला चांगला भाव मिळाला की तो शेतकऱ्यांना विकता येतो. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Eknath Shinde will start onion banks in 3 cities

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सई पल्लवी विवाहित अभिनेत्याला डेट करत आहे ज्याला दोन मुले आहेत? अभिनेत्रीबद्दल होतेय चर्चा

Thu Jul 25 , 2024
Sai Pallavi Dating Rumors virel: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत, सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवीच्या खाजगी आयुष्याबाबत धक्कादायक अफवा समोर आल्या आहेत.तर खरं काय परिस्तिथी आहे जाणून घेऊया.
Sai Pallavi Dating Rumors virel

एक नजर बातम्यांवर