Congress First list Names Of 48 Candidates: महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर काँग्रेसने अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या उमेदवार यादीबद्दल लोकांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे, महायुतीतील तीन पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहे तसेच महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गट त्यानंतर आता काँग्रेस पक्षाने देखील 48 उमेदवारीची यादी जाहीर केली. काँग्रेसच्या या यादीत सध्याच्या आमदारांना विविध ठिकाणी संधी देण्यात आली आहे. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा वाद अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी लांबणीवर पडली. तसेच अजूनही अनेक जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर काँग्रेसनेही पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 48 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात अक्कलकुवा येथून के.सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूरमधून शिरीषकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांचा समावेश आहे.
Congress First list Names Of 48 Candidates
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak
— Congress (@INCIndia) October 24, 2024
हेही वाचा: मनसेच्या 45 उमेदवारांची घोषणा, आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे आमनेसामने..
विश्वजीत कदम यांची पहिली प्रतिक्रिया
पलूस कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उमेदवारी जाहीर केली. भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांचे आभार त्यांनी मला पुन्हा एकदा पलूस-कडेगाववासीयांची सेवा करण्याची संधी दिली. विश्वजित कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेबांचे आभार मानले. थोरात, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते आणि महाराष्ट्रातील जनता यांचे असणारे मायावर प्रेम त्यामुळे मी आज येथे पर्यंत पोहोचलो आहे.
वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला संधी
धारावीतून वर्षा गायकवाड यांची बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चांदिवलीतून माजी मंत्री नसीम खान यांचे नाव उमेदवारी म्हणून समोर आले आहे. तेथे त्यांना शिवसेनेचे दिलीप लांडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातून यांचे आव्हान असेल.