Women T20 World Cup 2024: T20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून होणार, 10 संघ खेळणार, कुठे होणार सामना सविस्तर जाणून घ्या

Women T20 World Cup 2024: ICC महिला T20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आणि हे सामने दुबई मध्ये खेळवले जाणार आहे.

Women T20 World Cup 2024: महिला T20 विश्वचषक 2024 UAE (दुबई) येथे होणार आहे. महिला T20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विश्वचषक जिंकला आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि भारत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आणि आता सर्व सामने जिकंण्यासाठी इंडिया महिला संघ खूप मेहनत करताना दिसत आहे.

ICC महिला T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड 4 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत.

किती संघ सहभागी होतील?

महिला टी-20 विश्वचषक 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून फायनलसह 23 सामने खेळवले जाणार आहेत. या 10 संघांची प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताबाबत बोलायचे झाले तर त्याचा समावेश अ गटात करण्यात आला असून त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना दुसऱ्या गटात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा: मुंबईचा सर्वोत्तम खेळाडू मुंबई इंडियन्स संघ सोडतोय; IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार.

भारताचे सामने-

  • 4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
  • 6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका
  • 12 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

महिला T20 विश्वचषक 2024 अ गट आणि ब गट मधील संघ

  • अ गट: भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया.
  • ब गट: वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड.

Women T20 World Cup 2024

महिला T20 विश्वचषक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक-

  • 3 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
  • 3 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजा
  • 4 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
  • 4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
  • 5 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजा
  • 5 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजा
  • 6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
  • 6 ऑक्टोबर: वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
  • 7 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा
  • 8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजा
  • 9 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
  • 9 ऑक्टोबर: भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
  • 10 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा
  • 11 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
  • 12 ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजा
  • 12 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
  • 13 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
  • 13 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
  • 14 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
  • 15 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

सेमीफायनल आणि फायनल तारीख

  • 17 ऑक्टोबर: उपांत्य फेरी 1, दुबई
  • 18 ऑक्टोबर: उपांत्य फेरी 2, शारजाह
  • 20 ऑक्टोबर: फायनल, दुबई
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदीर; व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सिद्धिविनायक संस्थानची प्रतिक्रिया…

Tue Sep 24 , 2024
Rats in Siddhivinayak Temple Offerings: आंध्र प्रदेशातील तिरुपती प्रसाद वाद हा चालू असताना आता सिद्धिविनायक मंदिर प्रशासनामध्ये आणखी एक वाद निर्माण झाला आहे.
Rats in Siddhivinayak Temple Offerings

एक नजर बातम्यांवर