अक्षता म्हात्रेची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, आमदार गणेश नाईक यांची उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी…

1

Ganesh Naik’s letter Chief Minister Devendraji Fadnavis to get justice for Akshata Mhatre: नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे वर झालेल्या सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्यावर फाशीची शिक्षा मिळण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुत्ती करावी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे.

Ganesh Naik's letter Chief Minister Devendraji Fadnavis to get justice for Akshata Mhatre

नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आगास्कर या विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळण्याकरिता आमदार गणेश नाईक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना विशेष सरकारी वकील यांची नियुत्ती करुन सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्याबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे. तसेच आगरी कोळी समाज आणि इतर कुठल्याही समाजामध्ये पुन्हा हा प्रसंग घडू नये आणि अक्षता ताईला लवकरात लवकर न्याय मिळावा या भावनेने हा खटला लवकरत लवकर सुरु होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तेथील आमदार तसेच स्थानिक रहिवाशी आगरी कोळी आणि इतर समाज करत आहे.

Justice for Aksahta

आमदार गणेश नाईक यांनी काय मागणी केली आहे

दिनांक : 22/7/2024
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – 400032

विषय : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आगास्कर या विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळण्याकरिता याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुत्ती करुन सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की, नवी मुंबई कोपरखैरणे येथील अक्षता म्हात्रे आगास्कर या विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी केल्याची घटना घडली. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी महिलेवर सामूहिक अत्याचार करुन तिची
अमानुष हत्या करणारी ही घटना अत्यंत लाजीरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मंदिरामध्ये आश्रय घेतलेल्या व मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्याऐवजी तिच्यावर आत्याचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना महिलांकरिता असलेल्या कायद्याची भिती असावी व अशा घटना भविष्यात घडू
नये याकरिता दोषींना फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.

महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणे व त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे सरकारचे धोरण आहे अशा परिस्थितीत ही घटना या स्त्रियांच्या मनौधैर्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत याकरिता अक्षता म्हात्रे आगास्कर या महिलेवर सामूहिक अत्याचार व हत्येमध्ये जे दोषी आहेत आणि ज्यांचा या घटनेमध्ये सहभाग आहे त्या सर्वांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळण्याकरिता याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जावा ही विनंती.
धन्यवाद!

आपला नम्र,
(गणेश नाईक)

अक्षता म्हात्रे आगास्कर ही घटना महाराष्ट्राला अत्यंत लाजीरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तसेच सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई ह्या शहरामध्ये असे प्रकार घडल्यामुळे तेथील स्थानिक तसेच इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. तसेच ही घटना या स्त्रियांच्या मनौधैर्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. एवढ्या मोठ्या शहरामध्ये असे प्रकार घडत असतील तर महिला कुठेही सुरक्षित नाही आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी सुद्धा नाही. त्यामुळे आता प्रशासन यावर काय काळजी घेणार यावर सर्वांचे लक्ष वेधून आहे.

हे सुद्धा वाचा: धर्मवीर 2 मध्ये “आनंद दिघेंना संपवा” असे म्हणणारा कोण आहे? या ट्रेलरने पुन्हा एकदा चित्रपटाचा सस्पेन्स वाढवला आहे.

नवी मुंबईतील घणसोली मधील रॅली

नवी मुंबईतील घणसोली मधील समस्त नागरिकानी अक्षता म्हात्रेना न्याय मिळण्यासाठी मोठ्या संख्येने रॅली काढली होती. तसेच तेथील स्थानिक व इतर लोकांनी श्रद्धांजली वाहिली. रॅलीची परवानगी असून आता रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता कोपरखैरणे तीन टाकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रॅली निघणार आहे. नवी मुंबई व इतर भागातून आगरी कोळी व इतर समाज या रॅलीमध्ये उपस्थित राहणार असल्याची बातमी समोर येत आहे.

Ganesh Naik’s letter Chief Minister Devendraji Fadnavis to get justice for Akshata Mhatre

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Facebook Page Join Now

One thought on “अक्षता म्हात्रेची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, आमदार गणेश नाईक यांची उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Maruti Suzuki Jimny Discount: मारुती सुझुकीची जिमनी वर धमाकेदार ऑफर 3.30 लाख रुपये पर्यंत सवलत मिळवा.

Wed Jul 24 , 2024
Maruti Suzuki Jimny Discount: जर तुम्हाला तुमच्या ऑफ-रोडिंगसाठी जिमनी आवडत असेल तर कमी किमतीत ही SUV खरेदी करण्याची ही विलक्षण संधी सोडू नका. या वाहनावर […]
Maruti Suzuki Jimny Discount

एक नजर बातम्यांवर