Mumbai Rains Update: मुंबईतील कामगारांना सुखरूप घरी परतता यावे यासाठी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. विधानसभेचे कामकाज आता मंगळवारी सकाळी 11 वाजता बोलावण्यात येणार आहे. पावसामुळे मुंबईतील शाळा आणि संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास मुंबईत ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. यानंतर मुंबई हवामान खात्याने सोमवारी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला. परिणामी दुपारी एकच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबईतील पावसामुळे सोमवारी विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
Mumbai Rains Update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद
#Live |📍 मुंबई
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2024
🔸08-07-2024
🎥 पत्रकारांशी संवाद https://t.co/Jtl3XkybBq
हेही वाचा: जर तुम्ही मुंबईत पावसात अडकले असाल, तर मदतीसाठी 1916 नंबरवर कॉल करा.
मुंबईत कामगारांना सुखरूप घरी परतता यावे यासाठी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विधानसभेचे कामकाज आता मंगळवारी सकाळी 11 वाजता बोलावण्यात येणार आहे. पावसामुळे मुंबईतील शाळा आणि संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने मुंबईकरांना अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.