Cobra In Amazon Package Box: बेंगळुरूच्या एका जोडप्यानुसार ॲमेझॉन पॅकेजमध्ये जिवंत कोब्रा साप असल्याचे आढळून आले. या मुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या सुरक्षा, पॅकेजिंग आणि वितरण प्रक्रियेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. आणि लवकरच याची दखल घेण्यात येणार आहे.
आता इंटरनेटचे युग आहे. त्यामुळे आता ग्राहक ऑनलाईन शॉपिंग ला जास्त मह्त्व देत आहे. तसेच बंगलोरमधील एका जोडप्याने अमेझॉन वरून एक वस्तू ऑर्डर केली. ॲमेझॉन ऑर्डर पॅकेज आल्यावर बॉक्स खोलताच समोर काय आहे तर आश्चर्यचकित झाले. बॉक्स उघडताच त्यांच्यावर फुत्कार करताना कोब्रा (साप) दिसल्याने या जोडप्याला खूप भीती वाटली. या जोडप्याने सोशल मीडियावर हि सर्व घटना पोस्ट केली आणि ॲमेझॉनच्या उत्पादनांमध्ये साप असल्याचे सांगितले. सुदैवाने, साप पेटीच्या टेपला चिकटला होता, ज्यामुळे त्यांचे कुठलीही दुखापती झाली नाही . नाहीतर तो मोकळा असता तर कुणालाही चावू शकला असता. ही घटना जोडप्याने कॅमेऱ्यात कैद केली, त्यानंतर त्यांनी ती सोशल मीडियावर पोस्ट केली. तथापि, या घटनेमुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या पॅकेजिंग आणि डिलिव्हरी पद्धतींबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Cobra In Amazon Package Box
#सावधान_इंडिया #अमेजन #जिंदा_सांप
— Sohail Rahmani (@sohailrahmani66) June 18, 2024
कर्नाटक के बेंगलुरु में महिला ने ऑर्डर किया अमेजोन से और डिलीवरी बॉक्स से निकला जिंदा कोबरा सांप।
उपर वाले का शुक्र है की उस महिला और डेलिवरी बॉय को कुछ नहीं हुआ, बाल बाल बचा दोनों ।।@amazonIN @AltNews जरा खबर की पुष्टि कीजिए..@007AliSohrab pic.twitter.com/C2M0zJBw83
या जोडीचा दावा आहे की दोन दिवसांपूर्वी त्यांना Amazon कडून Xbox कंट्रोलर ऑर्डर केला होता, परंतु आश्चर्य म्हणजे, जेव्हा त्यांनी पॅकेज उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आत एक जिवंत कोब्रा साप होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पुरावा मिळाल्याचे कर्नाटक मधील सर्जापूर रोडवर राहणाऱ्या दाम्पत्याने सांगितले.
ग्राहक सेवा प्रतिनिधींनी 2 ते 3 तास फोनवर ठेवले
साप पॅकिंग टॅपमध्ये अडकला नसता तर कदाचित आमच्या फ्लॅट किंवा घरातील इतर लोकांना दुखापत झाली असती. त्यांनी असा दावा केला की त्यांच्या अत्यंत बेशिस्त पणा असूनही Amazon त्यांच्याकडे लक्ष देत नाही. याव्यतिरिक्त, ग्राहक सेवा प्रतिनिधींनी त्यांना दोन ते तीन तास फोनवर ठेवले. त्यानंतर त्यांनी स्वत:हून हे प्रकरण हाताळण्यास सांगितले होते. असे म्हटले जाते की मध्यरात्री या जोडप्याला महत्त्वपूर्ण अडचणीचा सामना करावा लागला असल्यामुळे लवकरच यावर योग्य कारवाई झाली पाहिजे असे या जोडप्या कडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: भारतीय दूरसंचारचा (TRAI) महत्वाचा निर्णय, फेक कॉल आता होणार पूर्ण बंद
पैसे परत मिळाले.
या घटनेनंतर चिंतेत असलेल्या जोडप्याला परतावा मिळाला, परंतु पॅकेजमधील सापामुळे त्यांचा मृत्यू झाला असता, म्हणून दोष कोण घेणार असा सवाल त्यांनी केला. ई-कॉमर्स व्यवसायांना त्यांच्या पॅकिंग आणि वितरण प्रक्रियेची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच आता कुठलाही प्रकार परत घडू नये यावर अमेझॉन कंपनीने दखल घेतली पाहिजे.