Aai Ekveera Palkhi Sohala 2024: महाराष्ट्रातील लाखो, कोळी, आगरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीने आपला पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात एकविरा गडावर पार पडला.
अवघा कार्ला गड जोरात, “आय आयलो” च्या जयघोषात अनेक बॅण्ड आणि इतर वाद्य च्या तालावर सर्व भाविक आपल्या एकवीरा आईच्या पालखी सोहळ्यात नाचत होते. आणि आई माऊलीचा “उदो उदो” हा गजर देण्यात येत होता.कोकण आणि मुंबईतून असंख्य पायी पालख्या गडावर दाखल झाल्या होत्या. दिवसभर पायी चालल्यानंतर भाविक कार्ला येथे पोहोचले होते.
कार्ला व वेहेरगाव यात्रेसाठी सजले होते. तसेच पालखी सोहळा संद्याकाळी 5 वाजता चालू झाला तसेच पालखीला गुलाल देखील खूप प्रमाणात उधळण्यात आला. या पालखी सोहळ्याची वाट हि आगरी कोळी आणि कुणबी व इतर समाज हा वर्षभर वाट बघत असतो. तसेच आई एकवीरेला लागणारा मान पण देखील देण्यात येतो.
खेळणी विक्रेते, कुंकू, प्रसाद, हरफुले या सर्वांनी त्यांची दुकाने विविध साहित्याने सजवली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही, यासाठी तालुका शासन व पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.या पालखी सोहळ्यात भाविकांना कुठलाही त्रास
तसेच कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये त्यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते.