बीसीसीआयने आगामी अंडर-१९ विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईत राहणाऱ्या आयुष म्हात्रेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच, बीसीसीआय निवड समितीने टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी बीसीसीआयने अंडर-१९ विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या स्पर्धेतही संघाच्या कर्णधारपदी मुंबईच्या खेळाडूची निवड झाली आहे. महाराष्ट्राचा असलेल्या आयुष म्हात्रेची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. विहान मल्होत्राला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
२०२६ अंडर-१९ विश्वचषकाचा संक्षिप्त आढावा
झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये अंडर-१९ विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान ४१ एकदिवसीय सामने खेळले जातील, ज्यात १६ देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येकी ४ संघांचे ४ गट आहेत, म्हणजेच एकूण १६ संघ आहेत. भारतीय संघ ‘अ’ गटात आहे. गट टप्प्यात भारतीय संघ अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्याशी खेळणार आहे.
हे देखील वाचा: रोहित शर्मा: ६,६,६,६,६,६,६,६,६… मुंबईच्या राजाने सिक्कीम वर षटकारांचा वर्षाव
भारतीय संघ आपला पहिला सामना कधी खेळणार?
१५ जानेवारी रोजी भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणार आहे. पहिला सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. सुपर-८ मध्ये प्रत्येक गटातील सर्वोत्तम दोन संघ असतील. त्यानंतर उपांत्य फेरीसाठी चार संघांची निवड केली जाईल. यातून दोन संघ विश्वचषक ट्रॉफीसाठी लढतील आणि विश्वविजेता निवडला जाईल.
🚨 News 🚨
— BCCI (@BCCI) December 27, 2025
India's U19 squad for South Africa tour and ICC Men’s U19 World Cup announced.
Details▶️https://t.co/z21VRlpvjg#U19WorldCup pic.twitter.com/bL8pkT5Ca2
भारतीय संघाच्या गट टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध अमेरिका, बुलावायो, १५ जानेवारी
- १७ जानेवारी रोजी भारतीय संघ बुलावायो येथे बांगलादेशविरुद्ध खेळेल.
- भारत आणि न्यूझीलंड २४ जानेवारी रोजी बुलावेयो येथे खेळतील.
भारतीय संघ सहाव्यांदा विश्वचषक जिंकेल का?
त्याचबरोबर, भारत हा १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेल्या सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक पाच वेळा जिंकला आहे. भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये हा किताब जिंकला. त्यामुळे, यावर्षी भारताला सहाव्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याची संधी आहे.
भारताचा १९ वर्षांखालील विश्वचषक संघ
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी आयुष म्हात्रे भारतीय संघाचा कर्णधार आहे. विहान मल्होत्रा उपकर्णधार आहे. संघातील इतर खेळाडू वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग, आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, देवेंद्रन दीपेश, किशन कुमार सिंग आणि उद्धव मोहन आहेत.
