मनसेला मोठा धक्का बसला आहे. दोन महत्त्वाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली आहे.

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. १५ तारखेच्या निवडणुकांसाठी सर्वजण तयारीला लागले आहेत. बैठकांचे सत्र सुरू आहे आणि उमेदवारांच्या याद्या जवळपास निश्चित झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या बाजूचे दोन महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. या दोन नेत्यांविषयी अधिक जाणून घेऊया.
📍 ठाणे |
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 27, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे… pic.twitter.com/kN3W0mGSeU
राज ठाकरे यांना मोठा धक्का
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राम शिंदे, जनसंपर्क प्रमुख राज ठाकूर, मनसेचे जिल्हा सचिव ॲड. शैलेंद्र कर्ले, भिवंडी मनसे विभाग अध्यक्ष श्रीनाथ भैरी, अनिल पवार, राजू प्रस्थान यांच्यासह इतरांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
परेश तेलंग आता शिवसेनेत
मुंबईतही मनसेला धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे प्रमुख आणि प्रभाग क्रमांक २१७ मधील संभाव्य उमेदवार परेश तेलंग यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. मनसेने तिकीट नाकारल्यामुळे तेलंग यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे. या बातमीचा आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, पण त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट अधिक मजबूत होईल.
