Delhi Capitals’ New Captain: WPL च्या चौथ्या हंगामापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स (DC) ने मुंबईस्थित फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सला त्यांची नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर ही माहिती दिली.

भारतीय क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने एक मोठी बातमी दिली आहे. दिल्लीने लवकरच सुरू होणाऱ्या महिला प्रीमियर लीग (WPL 2026) साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावर सांगितले होते की, ते २२ डिसेंबर रोजी एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आज, २३ डिसेंबर रोजी, संध्याकाळी सुमारे ६:३० वाजता आपल्या नवीन कर्णधाराबद्दल घोषणा केली. मोठ्या लिलावापूर्वी, दिल्लीने आपली नियमित कर्णधार मेग लॅनिंगला संघातून वगळले होते. यामुळे, पुढील हंगामासाठी कर्णधार कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता संघाने एका २५ वर्षीय खेळाडूला कर्णधार बनवले आहे. ती खेळाडू कोण आहे? चला पाहूया.
मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सला दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार बनवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सला दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार बनवण्यात आले आहे. जेमिमाला कर्णधारपद मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित होती. फ्रँचायझीचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले होते की, संघाची कमान एका भारतीय खेळाडूच्या हातात असेल. तेव्हापासून जेमिमाचे नाव या यादीत सर्वात वर होते. त्यानंतर, तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
हे देखील वाचा: टीम इंडियाच्या एका खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली. धवनच्या कॅप्टन्सीमध्ये केलेलं पदार्पण
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून जेमिमा दिल्लीकडून खेळत आहे. दिल्लीसाठी २७ सामन्यांमध्ये जेमिमाने १३९.६७ च्या स्ट्राइक रेटने ५०७ धावा केल्या आहेत.
जेमिमा रॉड्रिग्ससमोर सर्वात मोठे आव्हान काय आहे?
दिल्लीने दरवर्षी WPL स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. पण दिल्लीला तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यावर्षी जेमिमाला दिल्लीचा पहिल्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवावा लागेल.
जेमिमा रॉड्रिग्सने पहिली प्रतिक्रिया काय दिली?
दरम्यान, कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर जेमिमाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ही संधी दिल्याबद्दल फ्रँचायझी मालकांचे आभार मानले. जेमिमाने पुढे सांगितले की, दिल्ली कॅपिटल्स तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
CAPTAIN ROCKSTAR IS HERE TO RULE ❤️🔥🎸 pic.twitter.com/1fl0NWEPaj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 23, 2025
“दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मला सन्मानित वाटते. माझ्यावर नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मी मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानते. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर, पहिल्या हंगामापासून माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या संघाची कर्णधार होण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप खास आहे,” असे स्मृतीने सांगितले.
