कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी वाचा पूर्ण बातमी.

कोल्हापूर – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”
नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. पुढील 24 तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.